Manoj Jarange Patil Uposhan News Update: मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्याला तडीपारीची नोटीस........
मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर यांच्यावर तडीपारीची कारवाईची केली आहे . त्यांच्या विरोधात अनेक आरोप आहेत , जालना जिल्ह्यातील घनसांगवी आणि आंबड परिसरातील एकूण नऊ जनांवरती हि कारवाई करण्यात आली आहे , त्यातील प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर हे सध्या या कारवाई मुळे चर्चेत आहेत .
एकंदरीत विलास खेडकर यांच्यावर २०२१ साली ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक केल्या प्रकरणी त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती .
२०१९ पासून अनेक वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल केले गेले होते, अंबड उपविभागीय दंडाअधिकारी यांच्या आदेशाने हि तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे , पुढील नऊ जनावरती हि कारवाई केली गेली आहे , विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर अशा नऊ जणांविरोधात तडीपारीची नोटीस बजावली आहे .
या संपूर्ण कारवाई वरती मनोज जरांगे याना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी असं सांगितलकी , एक लक्ष्यात घ्या कि मी सामाज्याला प्रथम मानतो , माझा मेहुणा वगैरे असं काही बोलू नका , मेहुणा वगैरे ठीक आहे , मी माझ्या बापाला आणि संपूर्ण कुटुंबाला व्यासपिटावरून खाली उतरविलेला माणूस आहे . जर माझ्या मेहुण्याने गुन्हा केला असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जावी , जर माझा बापजरी गुन्हेगार असेल तरी कारवाई व्हावी , हि माझी कुटुंब म्हणून भुमिका आहे .
परंतु मला तुम्ही मराठा आंदोलक म्हणून विचाराल तर , मराठा समाज्यातील मुलांवरती किंवा आंदोलकांवरती गुन्हा दाखल करणार असाल , मराठा सामाज्याला वेठीस धरणार असाल तर मात्र समाज , आणि आंदोलक म्हणून आम्ही आमची भूमिका मांडू .
0 टिप्पण्या