MANOJ JARANGE UPOSHAN UPDATES : मनोज जरांगे पाटलांना कोण बदनाम करतंय , कोण आखतंय डाव ?
मनोज जरांगे फितूर होत नाही , गद्दारांना सामील होत नाही म्हणून हा बदनामीचा डाव आखला जातोय
मनोज जरांगे पाटलांना कोण बदनाम करतंय , कोण आखतंय डाव ? याचा छडा लावणं गरजेचं आहे .
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे , लवकरात लवकर कुणबी नोंदींची तपासणी केली जावी . फडणवीस सरकारने मान्य केलेल्या सर्व मागण्या लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे , आरक्षणाचा फटका सरकारला सोसणारा नाही . त्यांनी त्या भानगडीत पडू नये.
सरकारने मराठ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ नये . मला कितीही बदनाम करण्याचा डाव आखला गेला तरीही माझ्या सामाज्याला माहितीये मी रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी करून सामाज्याला आयुष्याची भाकरी देण्याचा प्रयत्न करतोय .
समाज हि ते पाहतोय , यापूर्वी सागराएवढा असणारा मराठा समाज एकत्र नव्हता त्यामुळे अनेक राजकारण्यांनी त्याकडे कानाडोळा केला . सामाज्याला याच नीच राजकारणापायी आरक्षणा पासून लांब राहावं लागलं .
पण आता मराठा सामाज्याचा वनवास संपणार आहे . कित्येक मुलं आता कुणबी दाखल्या मुळे सरकारी नोकरीत समाविष्ट झाली आहेत. मी त्यांच्या आई वडलांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघत असतो . त्यांच्या प्रमाणे इतर आई वडिलांच्या चेहऱ्या वरती मला आनंद बघायचाय
0 टिप्पण्या