Manoj Jarange Uposhan Update 2025: मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सहा दिवसानंतर स्थगित.......
आंतरवली सराटी येथे २५ जानेवारी पासून आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण गुरुवारी सहाव्या दिवशी अखेर स्थगित करण्यात आलं , सरकारचे प्रतिनिधी म्हणून सुरेश धस ,आमदार प्रकाश सोळुंके व खाजदार बजरंग बापा सोनावणे , तसेच जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ व इतर सरकारी अधिकारी उपस्तीत होते .
यावेळी बोलतां सुरेश धस यांनी असं सांगितलकी मनोज दादांच्या आठ मागण्यापैकी चार मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांना सरकार म्हणून मान्य आहेत.
त्या पुढील प्रमाणे......
१) न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देणे
२) कुणबी नोंदी शोधून काढणे
३) मराठा आंदोलकांवरील गुन्हे तपासून मागे घेणे ( गंभीर स्वरूपाचे वगळून )
४) प्रत्येक जिल्ह्यात मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यासाठी डेस्क उभारणे
वरील चार मागण्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने सरकार सकारात्मक आहे
तदनंतर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले कि मराठा आरक्षणासाठी मागील दिड वर्ष्यापासून आंदोलन सुरु आहे सरकारने तोडगा काढणं अपेक्षित होत ,
परंतु सरकारने यावर खास अशी पावले उचलली नाहीत त्यामुळे आम्हाला पुन्हां एकदा आमरण उपोषण करावं लागलं , परंतु फडणवीस साहेबानी कृपया मराठ्यांचा आंत पाहू नका ताबडतोब कार्यवाही चालू करा ,
इथूनपुढे शक्यतो मी आमरण उपोषण करण्याच्या भानगडीत पडणार नाही , सरकारने वेळीस सावध व्हावे , आम्ही आता वेगळ्या मार्गाने देखील आंदोलन करू शकतो , माझं काहीपण झालंतरी समाजाला मात्र मी आरक्षण मिळवूनच शांत बसणार हे मात्र नक्की .
हे उपोषण तूर्तास तरी स्थगित करतो शक्यतो पुन्हा उपोषण करणार नाही . उपोषण स्थगित केलं आहे संपलेले नाही हे लक्षात ठेवावे .
0 टिप्पण्या