Ticker

6/recent/ticker-posts

MANOJ JARANGE PATIL NEWS UPDATES: मनोज जरांगे पाटील यांचा सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल -सुरेश धस यांच्यावर राजकीय दबाव आणून खून पचवण्याचा प्रयत्न चालू आहे का ?

MANOJ JARANGE PATIL NEWS UPDATES: मनोज जरांगे पाटील यांचा सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल -  सुरेश धस यांच्यावर राजकीय दबाव आणून खून पचवण्याचा प्रयत्न चालू आहे का ?


सुरेश धस आणि धनंजय मुंढे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर , सामाज्यात आचार्य व्यक्त केलं जातंय . 

ज्या सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर , संतोष देशमुख हत्याकांडा वरून  तोंडसुख घेतलं होत , नानाविविध आरोपांची सरबत्ती लावली होती ,

त्याच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची गुप्तपणे भेट घ्यावी , हे सर्व सामान्यांना ना पटणार आणि न आवडणार आहे 

या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये सुरेश धस यांच्यावर रोष पसरलेला आहे . 

याच पप्रकरणा वरून मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांच्यावर हल्ला चढवलेला आहे , माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सुरेश धसांवर चौफेर फटकेबाजी केली . 

मनोज जरांगे माध्यमांशी बोलताना असे म्हणाले कि , मराठ्यांनी प्रचंड विश्वास हा सुरेश धस यांच्यावर टाकला , एवढ्या लवकर विश्वासघात होईल याची कल्पना सुद्धा कोणाला करवत नाही . 

अरे ज्या धसांनी धनंजय मुंढे यांच्यावर आरोप केले , आका काय आकाचा आका काय , पिक्चरातील डायलॉग काय , नवीन नवीन शब्द काय , या प्रकारे मंत्री धननंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला करणारा हा माणूस , राजकीय दाबावा पोटी कि ठरलेल्या षडयंत्राचा भाग म्हणून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली , हे समजण्या पलीकडचं आहे . 

यावर एक सांगतो ज्या माणसाच्या सोबत भाजप मधील एकही नेता नव्हता अशा माणसाला मराठ्यांनी निवडून दिला , तेपण मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिला तोच असा मराठ्यांवर उलटा फिरला हे आताही समजत नाही , यावर विश्वास बसत नाही. 

सुरेश धस यांनी जे काही केलं ते बरोबर केलं नाही , मराठ्यांचा  विश्वासघात राजकारणापायी करायला नको होता . 

राजकीय दबाव आणून तुम्ही सुरेश धस यांना संतोष देशमुख प्रकरणापासून दुर जायला लावतायत पण त्या पठ्याना म्हणावं या प्रकरणात मध्ये मनोज जरांगे उभा आहे कोणाला काय दिवे लावायचेत ते लावा मी मात्र संतोष देशमुखांना न्याय देणारच .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या