१) मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे हा कायदा अध्यादेश काडून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावें .
२) सगेसोयऱ्याची आमलबजावणी ताबोडतोब करावी ( ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याच्या सर्व सग्यासोयऱ्या कुणबी प्रमाणपत्र द्या .
३) शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ द्यावी आणि मोडी , फारसी, उर्दू भाषेतील अभ्यासकांकडून अधिकच्या नोंदी कश्या सापडतील याचा शोध ताबडतोब घेण्यात यावा .
४) ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना लगेच ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावे .
५) मराठा आंदोलकांवरील सर्व खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे .
६) सातारा संस्थान , बॉंबे गव्हर्नमेंट च , औन्ध संस्थानच , हैद्राबाद संस्थान ,चं असणार गॅजेट हे तात्काळ लागू करा. ७) मराठा आरक्षणासाठी आत्महत्त्या केलेल्या बांधवाना आजून सरकारने निधी दिलेला नाही , त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेतलेलं नाहीये त्यांना तातडीने घेण्यात यावे .
वरील सर्व मागण्या ह्या जुन्याच आहेत , यात नवीन काही नाही तरी मुख्य मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्या तात्काळ मार्गी लावाव्यात अशी विनंती माननीय जरांगे पाटील यांनी केली आहे .
तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना फाशी द्यावी, सोमनाथ सूर्यवंशी व वाकोडे साहेब यांच्या कुटुंबीयांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात हि विनंती .
सामोहिक उपोषण आहे , गर्दी खुप आहे आपण आपली काळजी घ्या , उपोषण कर्त्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्यांनी आपण ५-१० एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे तिथे थांबावे हि विनंती .
0 टिप्पण्या