Ticker

6/recent/ticker-posts

Manoj Jarange Patil Uposhan Update : मराठा आंदोलक आणि उपोषण कर्ते , जरांगे पाटील यांचे सकल मराठा समाजाला आव्हान...........

 Manoj Jarange Patil Uposhan Update : मराठा आंदोलक आणि उपोषण कर्ते , जरांगे पाटील यांचे सकल मराठा समाजाला आव्हान...........


किती दिवस घरात बसायचं आता लढाई आर या पारची आहे . सर्व मराठ्यांनी आपल्या मुला बाळांसाठी , येणाऱ्या नवीन पिढ्यांसाठी, आपल्याला आयुष्याची भाकरी मिळवून द्यायची आहे . येणाऱ्या काळात या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्या घराघरातून आपल्या मुलांना आयुष्याची भाकरी मिळेल हे मात्र नक्की , आता मी मागे हटणार नाही . 

आजपर्यंत मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण , कोणीही दिल नाही पण आपल्या या गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनामुळे , मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि त्यातून अनेक जणांना आयुष्याची भाकरी मिळाली असे अनेक जण मला भेटून गेले . 

काहींचं म्हणणं असं आहे कि आता सरकारी नोकऱ्याच राहिल्या नाहीत तर आरक्षण कश्याला , त्यांना मला सांगायचंय बाबानो असं नाहीये जे इतरांचं होईल तेच आपलं होईल आधी आरक्षणं भेटुद्या मग तुम्हाला कळेल काय बदल होतील ते . 

आरक्षणामुळे आपल्या लेकरांना सवलती मध्ये शिकता येईल आणि शिक्षणानेच आपल्या सामाज्याची प्रगती होईल , बहुसंख्य समाज हा दर्जेदार शिक्षणापासून वंचित असणं हे आपल्या राष्ट्राला परवडणार नाही , मराठा सामाजात असंख्य गरीब होतकरू विध्यार्थी आहेत त्यांना शिक्षण घेता येईल . आर्थिक परिस्तिथी बिकट असली तरी शिक्षणासाठी आपल्या मुलांना आणि त्यांच्या आई बापाला फासावर जाण्याची वेळ येणार नाही . 

असंख्य मराठा बांधवानी या आरक्षणाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिली , त्यांना देखील आपल्याला न्याय मिळवून द्यायचाय . 

मी मरायला घाबरत नाही , आता माघार घ्यायची नाही आता आरक्षण घेऊनच थांबायचं . जय शिवराय . 

असं आंदोलक मनोज दादा जरांगे म्हणाले . 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या